कुणबी प्रमाणपत्र कढण्यासाठी वंशावळ जुळणी

 कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रकरण तयार करायचे तर संबंधित कुटुंबाची वंशावळ जुळवावी लागते. त्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रांची गरज लागते. संबधिताच्या मुळ गावातील तहसिल कार्यालयाद्वारे उपलब्ध कुणबी असलेल्या व्यक्तीच्या जन्म अथवा मृत्यु नोंदी पाहून त्यातील संबधितांच्या वंशजांचे नाव शोधावे. या नावाशी किंवा  जन्म / मृत्यु नोंदीत अढळून आलेल नाव हेच संबंधिताच्या वंशजांच्या मालकीच्या  जमीनी संदर्भातील ७/१२ वा इतर कागदपत्रात अढळुन यायला हवे. अन्यथा कुणबी जात दाखला प्रकरण मंजुर होणार नाही. ही कागदपत्रे शोधन्यास संबंधितांचा गट तसेच सर्वे नंंबर आवश्यक असतो.

१) ७/१२ उतारे :- कुणबी जात प्रमाणपत्रासाठी वंशावळ जुळविण्याकामी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ७/१२ उतारा होय. जमीनीचा सात - बारा उतारा नोंदी करण्यास सुमारे १९३० सालापासून सुरुवात झाली. साधारणता १९०० नंतरची जन्म किंवा मृत्युची नोंद असेल तर  केवळ १९३० ते आज पर्यंतचे सात - बारा उतारे काढल्यास त्याद्वारे वंशावळ तयार करुन कुणबी जन्म-मृत्यु नोंंदीतील व्यक्ती प्रमाणे असल्यास वा जुळल्यास कुणबी जात प्रमाणपत्राचे प्रकरण करता येईल. उदाहरण खालील प्रमाणे: 

  • तहसिलच्या यादीतील कुणबी जन्म मृत्यु नोंदीमध्ये अढळलेले नाव (उदाहरणादाखल) : 
    • बाबुराव भीवा जाधव
  • वंशावळ   (उदाहरणादाखल) ;
    • अर्जादार :- विजय सदाशिव जाधव             (शाळा सोडल्याचा दाखला / चालु ७/१२)
    • वडील :      सदाशिव काशिनाथ जाधव        (शाळा सोडल्याचा दाखला / ७/१२ - इ.स. २०११)
    • आजोबा :   काशिनाथ दगडु जाधव             (७/१२ उतारा इ.स. १९८७ नुसार)   
    • पणजोबा : दगडू बाबुराव जाधव                 (७/१२ उतारा इ.स. १९४६ नुसार)
    • खापर पणजोबा : बाबुराव भीवा जाधव        (७/१२ उतारा इ.स. १९३० नुसार)
  • याप्रमाणे प्रकरण जुळायला हवे तरच मंजुर होते. 
  • मधीलच एखादे नाव ७/१२ उतार्‍यावर येत नसल्यास / नाव लागण्याच्या आगोदर संबंधिताचा मृत्यु झाल्याने पुढे नोंदी लागताना एक पिढी ओलांडुन नाव लागलेले असल्यास संबंधित नोंद झाल्याच्या फेरफार वरुन मधले नाव शोधता येते. त्यामुळे ७/१२ मध्ये उल्लेखित सर्व फेरफार काढावेत. 
एवढ्यावर प्रकरण वंशावळ जुळत नसल्यास किंवा अधिक जुनी जन्म मृत्यु नोंद असल्यास खालिल कागदपत्रे काढावीत.

२) शेतवारपत्रक  :- तहसिल कार्यालयाच्या अभिलेख कक्षातून (रेकॉर्ड रुम) सदर कागदपत्र काढावे. हे आंदाजे इ.स. १८९० ते १९१० दरम्यानचे असते. 

३) आकारबंद :- तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या अभिलेख कक्षातून (रेकॉर्ड रुम) सदर कागदपत्र काढावे. हे आंदाजे इ.स. १८९० ते १९१० दरम्यानचे असते. 

४) अनुक्रमणिका (Index) :- तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या अभिलेख कक्षातून (रेकॉर्ड रुम) सदर कागदपत्र काढावे. हे आंदाजे इ.स. १८९० ते १९१० दरम्यानचे असते. 

५)  टिपणबुक :- तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या अभिलेख कक्षातून (रेकॉर्ड रुम) सदर कागदपत्र काढावे. हे आंदाजे इ.स. १८६५ दरम्यानचे असते. 

शेवटचे तीन कागद (क्र. ३, ४, ५) हे अनेकदा मोडी लिपीत असतात त्याचे मोडी ते देवनागरी (मराठी) लिप्यंतर करुन घ्यावे लागते. 


संपर्क :- सुरेंद्र अर्जुन शिरसट 
फोन न. 9921259489

Comments

Popular posts from this blog

अठराव्या शतकातील कागदपत्रांतील हिशोब मांडणीचे स्वरूप - डॉ. सुरेंद्र अर्जुन शिरसट