मोडी कागदपत्रांतील रेघी हिशेबाची पद्धती – डॉ. सुरेंद्र अर्जुन शिरसट

          मोडी कागदपत्रांत हिशोब लिहिताना नेहमीच रेघी मांडणी पद्धतीचा उपयोग केला जातो. अपूर्णांकातील रक्कमेच्या तसेच धान्य व द्रव पदार्थ मोजण्याच्या वजनी आणि मापी स्वरूपातील नोंदी लिहिण्यासाठी रेघी पद्धत वापरली जाते. मोडीतील रेघी हिशोब लेखनातील समजुतीसाठी पुढील तक्ता समजून घ्यावा लागतो.

·l·

पाव

 

२l

सव्वा दोन

·ll·

अर्धा

 

२ll

अडीच

·lll·

पाऊण

 

२lll

पावणे तीन

१l

सव्वा

 

३l

सव्वा तीन

१ll

दिड

 

३ll

साडे तीन

१lll

पावणे दोन

 

३lll

पावणे चार

·       रकमेच्या नोंदीसाठी रेघी पद्धत

          मध्ययुगीन पद्धतीनुसार रुपये, आणे, पैसे, पै या प्रकारचे चलन असे. एक रुपया हा सोळा आण्यांचा असे. एक आणा हा चार पैशांचा असे. एक पैसा हा तीन पै चा होता. रुपये पूर्णांकात असल्यास अंकांचा वापर केला जात असे. मात्र अपूर्णांकांत असल्यास रेघी पद्धत वापरून लेखन केले जात असे. बारा आण्यांसाठी ॥। अशा तीन रेषा, आठ आण्यांसाठी ॥ अशा दोन रेषा वापरल्या जात. तर चार आणे असल्यास एक ऊभी रेषा । अशा प्रकारची वापरली जाते. तीन आण्यांसाठी ≡ अशा तीन आडव्या रेषा, दोन आण्यांसाठी = अशा दोन आडव्या रेषा तर एक आण्यासाठी − अशी एक आडवी रेषा काढली जाते. तीन पैशांसाठी lll अशा तीन उभ्या रेषा, दोन पैशांसाठी अशा ll दोन उभ्या रेषा तर एक पैशासाठी । अशी एक उभी रेषा काढली जाते. दोन पै साठी ॥ अशा दोन रेषा, एक पै साठी एक उभी रेषा । अशी, काढत. तीन पै म्हणजे एक आणा होई. तर एक आण्यासाठी एक आडवी रेषा − अशा प्रकारची काढली जात असे. दोन आण्यांसाठी दोन आडव्या रेषा = याप्रमाणे काढल्या जात.

तक्ता १ रेघी लेखन : रक्कम - अंक

आणे

आणे

पैसे

पै

१२

lll

३

≡

३

lll

२

=

८

ll

२

=

२

ll

१

−

४

l

१

−

१

l

--

--

 

अशी रक्कम लिहिताना त्यांचा क्रम ठरलेला असे. सुरुवातीस प्रथम पूर्णांकातील रक्कम अर्थात रुपये लिहित उदा. ५, ८८, १२; दुसर्‍या क्रमावर चारच्या पटीतील आणे लिहितात जसे चार, आठ, बारा उदा. ।, ॥, ॥; तिसर्‍या क्रमावर एक, दोन वा तीन आणे उदा. −, =, ≡; चौथ्या क्रमावर पै लिहित एक पै, दोन पै उदा. ।, ॥ याप्रमाणे लेखन केले जात असे.

एखाद्या क्रमावर रिक्त स्थान असल्यास त्या जागी େ(इंग्रजी सहा େ अंकाप्रमाणे) चिन्ह काढले जाते. େ यास आळे असे संबोधले जाते. याचा अर्थ सदर क्रम रिकामा आहे किंवा रिक्त स्थान आहे आणि त्यापुढील जागी अंक किंवा रक्कम आहे. कधी आळे େ लिहिण्याऐवजी ∙ असे चिन्ह सुद्धा वापरले जाते. रकमेच्या नोंदीसाठी रेघी पद्धत वापरण्याची उदाहरणे पुढील प्रमाणे पाहू.

तक्ता २ रेघी लेखन : रकमांचे लेखन

 रक्कम - अक्षरी

रेघी

रक्कम - अक्षरी

रेघी

दोन रुपये चार आणे

२।

नव्वद रुपये तेरा आणे

९०॥।−

पाच रुपये दहा आणे दोन पैसे

५॥=॥

सात आणे

∙।≡

पावणे सात रुपये

६॥।

अकरा रुपये दोन आणे एक पै

११େ=।

बारा रुपये, बारा आणे आणि एक पै

१२॥।େ।

सव्वा नऊ रुपये दोन पैसे

९।∙॥

·       वजनी किंवा मापी हिशोबाची रेघी पद्धत

धान्य मोजण्यांसाठीच्या परिमाणात खंडी, मण, पायली आणि शेर ही प्रमुख मापे असत. इतर लहान आकाराची मापे असत. अशी आदशेर, पावशेर, छटाक, तोळा लहान मापे असत. मोठ्या मापांचा उपयोग धान्य मोजण्यासाठी तर छोट्या मापांचा उपयोग मसाले, गूळ, किराणा मोजण्यासाठी करीत असत. त्यांचा परस्पर मेळ पुढील प्रमाणे असतो.

१ खंडी = २० मण, १ मण = १६ पायल्या किंवा १ मण १२ पायल्या, १ पायली = ४ शेर, १ शेर = १६ छटाक, १ शेर  = ४ पावशेर, १ शेर = २ आदशेर किंवा आच्छेर, १ आदशेर किंवा आच्छेर = ८ छटाक, १ पावशेर = ४ छटाक, १ छटाक = ५ तोळे असे याचे प्रमाण असते. यामध्ये किती पायल्यांचा मण हे वहिवाट व स्थानिक पद्धतीनुसार ठरलेले असे. त्याचा संबंधित कागदपत्रात स्वतंत्र उल्लेख बारुले माप (बारा पायल्यांचा मण) किंवा सोळूले माप (अर्थात सोळा पायल्यांचा मण) केलेला असतो. याचाही लेखन क्रम ठरलेला असतो. खंडी, मण, पायली, शेर या क्रमाने लेखन केले जाते. यामध्येही आळे େ किंवा • या चिन्हांचा वापर केला जातो.

खंडी, मण, पायली, शेर यातील प्रत्येक मापासाठी पूर्ण अंक व अपूर्णांक दोन्ही आवश्यकतेनुसार वापरले जातात. जसे अक्षरी सव्वा खंडी १। = १ खंडी व ५ मण; पावणे तीन खंडी सव्वा दोन मण २।।।२। (बारुले माप) = २ खंडी १७ मण ३ पायली. याची रेघी उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.

तक्ता ३ रेघी लेखन : मापे

मण माप- बारुले

मण माप - सोळूले

रेघी

खंडी

मण

पायली

शेर

रेघी

खंडी

मण

पायली

शेर

१२॥·।

१२

१०

३

---

१०େ३॥१

१०

३

८

१

५େ२େ६॥

५

२

६

१.५

२०॥େ३॥

२०

१०

३

२

८॥१େ४॥

८

११

--

४.५

३१।େେ॥

३१

४

---

२

 


Comments

Popular posts from this blog

कुणबी प्रमाणपत्र कढण्यासाठी वंशावळ जुळणी

अठराव्या शतकातील कागदपत्रांतील हिशोब मांडणीचे स्वरूप - डॉ. सुरेंद्र अर्जुन शिरसट