Posts

Showing posts from May, 2025

कुणबी प्रमाणपत्र कढण्यासाठी वंशावळ जुळणी

 कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रकरण तयार करायचे तर संबंधित कुटुंबाची वंशावळ जुळवावी लागते. त्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रांची गरज लागते. संबधिताच्या मुळ गावातील तहसिल कार्यालयाद्वारे उपलब्ध कुणबी असलेल्या व्यक्तीच्या जन्म अथवा मृत्यु नोंदी पाहून त्यातील संबधितांच्या वंशजांचे नाव शोधावे. या नावाशी किंवा  जन्म / मृत्यु नोंदीत अढळून आलेल नाव हेच संबंधिताच्या वंशजांच्या मालकीच्या  जमीनी संदर्भातील ७/१२ वा इतर कागदपत्रात अढळुन यायला हवे. अन्यथा कुणबी जात दाखला प्रकरण मंजुर होणार नाही. ही कागदपत्रे शोधन्यास संबंधितांचा गट तसेच सर्वे नंंबर आवश्यक असतो. १) ७/१२ उतारे :- कुणबी जात प्रमाणपत्रासाठी वंशावळ जुळविण्याकामी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ७/१२ उतारा होय. जमीनीचा सात - बारा उतारा नोंदी करण्यास सुमारे १९३० सालापासून सुरुवात झाली. साधारणता १९०० नंतरची जन्म किंवा मृत्युची नोंद असेल तर  केवळ १९३० ते आज पर्यंतचे सात - बारा उतारे काढल्यास त्याद्वारे वंशावळ तयार करुन कुणबी जन्म-मृत्यु नोंंदीतील व्यक्ती प्रमाणे असल्यास वा जुळल्यास कुणबी जात प्रमाणपत्राचे प्रकरण करता य...